माझा देश महान निबंध मराठी | Bharat Desh Mahan Nibandh Marathi
Bharat Desh Mahan Nibandh Marathi: आज आपण भारत देश महान निबंध या विषयावर निबंधलेखण करणार आहोत.
आपला महान भारत देश अनेक क्षेत्रांत आघाडीवर आहे. देशाचे नाव ऐकल्यावर मान अभिमानाने उंचावते. भारतात अनेक जातीचे, धर्माचे लोक एकजुटीने मिळून राहतात. भारतामध्ये आढळणार्या विविधतेच त्याची एकता आहे.
दिलेला Bharat Desh Mahan Marathi Nibandh तुम्ही शाळा किंवा महाविद्यालयीन प्रकल्पासाठीही वापरू शकता.
चला तर मग या निबंधद्वारे जाणून घेऊया अधिक माहिती: Maza Bharat Mahan Nibandh Marathi
माझा देश महान निबंध 10 ओळी (100 शब्द)
- भारत माझा देश आहे. भारताचा नागरिक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
- भारत हा जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे.
- माझ्या देशाला समृद्ध असा प्राचीन, ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा लाभला आहे.
- प्रांत, जाती, भाषा, वेशभूषा, आहार-विहार यात देशात कमालीची विविधता आहे.
- या विविधेतही देशातील एकता व अखंडता अवाधित आहे.
- हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, तर तिरंगा हा राष्ट्रध्वज आहे.
- जन गण मन हे देशाचे राष्ट्रगीत असून, सत्यमेव जयते हे देशाचे बोधवाक्य आहे.
- संविधान हा देशाचा आत्मा असून त्यानुसार देशाचा सर्व कारभार चालतो.
- माझा देश विकसनशील असून तंत्राद्यान, आरोग्य, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात भरारी घेत आहे.
- माझा देश माझा अभिमान आणि माझा देश माझी जबाबदारी आहे.
माझा देश महान कविता
माझा भारत देश माझा अभिमान:
चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान
भारत देश महान, भारत देश महान ||धृ.||
हिमालयची हिमशिखरे ती | भारतभूच्या शिरी डोलती |
गंगा, यमुना आणि गोमती | घालिती पवित्र स्नान ||१||
इतिहास नवा हा बलिदानाचा | शौर्याचा अन् पराक्रमाचा |
समतेचा अन् विश्वशांतीचा | जागवी राष्ट्रभिमान ||२||
शौर्याने जे वीरचि लढले | रणांगणी ते पावण झाले |
भारतभूचे स्वप्न रंगले | चढवूनि उंच निशाण ||३||
भारत देश महान निबंध 300 शब्द | Bharat Desh Mahan Nibandh
मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे. ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’ ही प्रतिज्ञा वाचताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो.
भारत हा प्राचीन देश आहे. त्याचा इतिहास वैभवशाली आहे. प्राचीन काळात भारत समृद्ध व द्यानात अग्रेसर होता. भारताला सुवर्णभूमी म्हणून ओळखला जात असे.
जगातील विद्वान भारतातील तक्षशिला, नालंदा या विद्यापीठांत द्यान घेण्यासाठी येत असत. विद्यांप्रमाणे कलांमध्येही माझ्या भारताची मोठी कामगिरी आहे. |Bharat Desh Mahan Nibandh Marathi
भारतात भौगोलिक विविधता आहे. उत्तरेला उत्तुंग हिमालयाची सीमा आहे. तसेच भारतातील हवामान वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असल्याने धान्ये, फळे, भाज्या यांच्यातही विभिन्नता आढळते.
भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात व ते भिन्न भाषा बोलतात. या सर्व भाषांतील साहित्य समृद्ध आहे.
भारत हा जसा वीरांचा, शुरांचा देश आहे तसाच तो संतांचाही देश आहे. अनेक थोर समाजसुधारक व विचारवंत येथे जन्मले. या सार्यांनी भारतीय जनतेत उच्च, उदात्त मूल्ये रुजवली, म्हणूनच अहिंसेच्या आणि सत्याग्रहाच्या मार्गाने भारताने आपले स्वातंत्र्य मिळवले.
भारताने दीडशे वर्षे गुलामगिरी सहन केली आणि एकजूट होऊन भारतीयांनी लढा दिला व १९४७ साली स्वातंत्र्य मिळवले. |Bharat Desh Mahan Nibandh Marathi
स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांत भारताने विविध क्षेत्रात विकास साधला. आजही माझा भारत महान सतत प्रगती करत आहे.
विविध जाती, विविध धर्म व विविध भाषा ही माझ्या भारताची वैशिष्ठ्ये आहेत. येथे सर्व भारतीय प्रेमाने एकत्र राहतात.
कधीकधी काही समाजविघातक शक्ति भारतीयांचे हे ऐक्य नष्ट करण्याचा यत्न करतात; पण या देशाचे ऐक्य अबाधित राहिले आहे.
भारताची मोठी शक्ति ही मनुष्यबळ आहे. |Bharat Desh Mahan Nibandh Marathi
हरितक्रांतीच्या मार्गाने जाऊन भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे. श्वेतक्रांती झाल्यामुळे दहयादुधाची लयलूट झाली.
आज औद्योगिक आणि वैद्यानीक क्षेत्रांतही भारत प्रगती करत आहे.
म्हणूनच माझा आधुनिक भारत देश महान आहे. असा भरात देश मला अतिशय प्रिय आहे.
माझा भारत महान |भारत देश निबंध मराठी 8वी
प्राचीन काळी भारताची ही सुवर्णभूमी द्यान आणि वैभव यांनी संपन्न होती. जगाच्या कानाकोपर्यातून अनेक प्रवासी भारतात येत असत. नालंदा, तक्षशिला या ठिकाणी विद्यापीठे होती.
आपल्या महान भारत देशात अनेक राजे होऊन गेले. त्यांनी भारतात स्वराज्य व सुराज्य निर्माण केले.
भारताने वेळोवेळी आपल्या स्वराज्यासाठी संघर्ष केला. महात्मा गांधीजीच्या मार्गदर्शनाखाली प्रबळ इंग्रजी सत्तेविरुद्ध दिलेला लढा हा अविस्मरणीय आहे.
आज एकविसाव्या शतकात भारतात जगातील सर्वात मोठी लोकशाही नांदत आहे.
भारत हा ‘सुजलाम सुफलाम’ देश आहे. |Bharat Desh Mahan Nibandh Marathi
आपल्या महान भारत देशाला ऋतूंची विविधता लाभली आहे. त्यामुळे भारतात येणाऱ्या उत्पन्नात विविधता असते. फळे, फुले, धान्ये यांत विविधता आढळते.
भारतात अनेक धर्माचे, विविध पंथाचे, जातीचे लोक राहतात. त्याच्या भाषाही विभिन्न आहेत. या विविधतेच माझ्या महान भारताची एकता आहे आणि म्हणूनच माझा देश महान (Maza Desh Mahan) आहे.
आज भारत देश अनेक क्षेत्रांत अग्रेसर आहे. मनुष्यबळ ही भारताची प्रचंड शक्ति आहे. धनधान्ये व दूधदुभते यांत भारत स्वावलंबी आहे. औद्योगिक क्षेत्रातही तो सतत प्रगतिशील आहे.
आजच्या संगणकयुगात ‘सॉफ्टवेअर’ च्या क्षेत्रात भारतीय युवकांची कामगिरी आश्चर्यकारक आहे. अंतराळात भारताची कामगिरी लक्षणीय आहे. क्रीडाविश्वात भारतीयांची कामगिरी नेत्रदीपक आहे.
म्हणूनच मी म्हणतो,
‘माझा देश महान, माझा भारत देश माझा अभिमान‘
हे देखील वाचा:
- माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh
- माझ्या स्वप्नातील भारत निबंध |Mazya Swapnatil Bharat Essay in Marathi
माझा भारत देश निबंध |Bharat Desh Mahan Nibandh Marathi
माझा भारत देश माहिती (निबंध):
“जननी जन्मभूमी स्वर्गादपि गरियसी”
आपला भारत देश हा विशाल आहे. भारताच्या उत्तरेस हिमालय, पश्चिमेस अरबी समुद्र, आणि दक्षिणेस हिंदी महासागर आहे.
जगातील अतिभव्य असा हिमालय आणि विंध्याचल, सातपुडा व सह्याद्रि यांसारखे पर्वत आपल्या देशात आहेत.
गंगा, यमुना, कृष्णा, नर्मदा, गोदावरी अशा मोठमोठ्या नद्या महान भारतात आहेत. त्यांच्या पाण्यामुळे जमीन सुपीक बनून अनेक पिके, फळे, फुले यांनी भारतभूमी समृद्ध झाली आहे.
अनेक पराक्रमी राजे-महाराजे, धर्मसंस्थापक, संत आणि स्वातंत्र्यासाठी लढणार्या महान विभूति आपल्या देशात होऊन गेल्या. त्यांनी भारताची संस्कृती घडवली, वैभव वाढवले.
भारतात विविध भाषेचे, जातीचे, धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. हिंदी ही आपल्या महान भारताची राष्ट्रभाषा आहे. |Maza Bharat Desh Nibandh in Marathi
द्वारका, काशी, जगन्नाथपुरी, पंढरपूर, शेगाव, शिर्डी यांसारखी पवित्र तीर्थक्षेत्रे येथे आहेत. काश्मीर, गोवा, व केरळच्या सृष्टीसौंदर्याला जगात तोड नाही.
ताजमहाल, कुतुबमिनार या ऐतिहासिक वास्तू आणि अजिंठा वेरूळ सारखी कोरीव लेणी तर जगातील आश्चर्ये ठरली आहेत.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वराज्य मिळाले. आज आपला भारत हा स्वतंत्र प्रजासत्ताक असा देश आहे. भारत आज विद्यानक्षेत्रात, क्रीडाक्षेत्रात व निरनिराळ्या उद्योगधंद्यात प्रगती करत आहे.
अशा या विविधतेने नटलेल्या संपन्न भारताचा प्रत्येकाला हवा अभिमान, म्हणूनच प्रत्येक भारतीयाने म्हणावे..
‘माझा भारत महान, माझा भारत महान!’
माझा देश माझी जबाबदारी निबंध | Maza Desh Maza Abhiman Nibandh
मंगल, पवित्र, सुजलाम्, आणि सुफलाम् असा महान देश म्हणजे भारत देश. भारत हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मला माझा देश स्वर्गाहुन प्रिय आहे. मी भारतीय आहे याचा मला अभिमान आहे.
सुंदर है जग मे सबसे,
नाम भी न्यारा है जहां जाती भाषा से बढकर,
देश प्रेम की धारा है निच्छल,
पावन, प्रेम पुराणा,
वो भारत देश है हमारा|
द्याते, वक्ते, आणि श्रोते हो. आजच्या विचाराने विस्कटलेल्या, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या, नीतीमत्ता हरवलेल्या समाजात देशाचे भावी आधारस्तंभ समजल्या जाणार्या आजच्या युवपिढीने विचारपूर्वक पाऊल टाकले पाहिजे.
आपल्या राष्ट्राचा विचार करता करता, आपल्या देशाने एक एक गोष्ट पद्धतशिरपणे गमावली आहे.
संपत्ति ..निसर्गसंपती पाठोपाठ संस्कार, स्वाभिमान, आत्मतेज, धर्मशाळेसारख्या झालेल्या या देशाने रामायण आणि महाभारत या महाकाव्यातील संस्कारशीलतेकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मौज, मजा, व्यसनाधिनता यांच्या दुष्टचक्रात युवपिढी अडकत गेली. |Bharat Desh Mahan Nibandh Marathi
त्यामुळे या युवपिढीला मला कळकळीचे आवाहन करावेसे वाटते की इतिहासाची जाण व राष्ट्रामातेचे प्रेमाचे भान ठेवूनच जीवन जगायचे म्हटले तर रामायणातील तत्त्वे नक्कीच राष्ट्रउभारणीसाठी प्रेरणास्त्रोत ठरतील.
माझा देश समर्थ भारत बनवायचा असेल तर आजच्या तरुण पिढीमध्ये – लाथ मारीन तिथ पानी काढण्याची धमक त्याच्या रक्तात असावी.
स्वत:च्या कष्टाने मिळवलेली कोंडाभाकरी का असेना ती चालेल, पण दुसर्याच्या आयुष्याची होळी करून मिळवलेली पोळी खाण्याची इच्छा त्याला नसावी. |Maza Bharat Desh Nibandh in Marathi
राष्ट्रपती नितांत आदर असावा त्यासाठी वाटेल ते त्याग करण्याची तयारी असावी.
भारत माझा देश आहे अस आपल्याला म्हणायच असेल तर या देशातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरीबी, अस्वच्छता यांसारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा तरच विकसित भारताचा जन्म होईल व आपण अभिमानाने म्हणू –
सारे जहां से अच्छा…
हिंदोस्ता हमारा
हम बुलबुले है इसकी
ये गुलिस्ता हमारा…
मातृभूमीच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या तरुण पिढीची आहे. त्यामुळे तरुणांनी आपापल्या इच्छेनुसार भूदल, नौदल, हवाई दल मध्ये जावून देशाबद्दल आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
विद्यान, कला, शिक्षण क्षेत्रात तरुणांनी देशाच्या गरजा भागवल्या पाहिजेत. देशातील अन्नधान्याची कमतरता, रस्त्यांची गरज, वीजनिर्मिती या समस्या तरुण पिढीने जाणून घेतल्या पाहिजेत.
आजची युवा पिढीच देशाला विकासाची नवीन दिशा दाखवू शकते. |Bharat Desh Mahan Nibandh Marathi
शेती, व्यापार, आणि उद्योग क्षेत्रात आधुनिक पद्धतीचा वापर केला पाहिजे. हुंडा न घेता लग्न करण्याचा निश्चय केला पाहिजे.
यासाठी देशातील प्रत्येकाने चांगला नेता, सेनापती, शिक्षक, डॉक्टर, सैनिक, कलाकार बनून देशाच्या विकासासाठी आपले योगदान दिले पाहिजे.
‘माझा देश माझी जबाबदारी‘ हे लक्षात ठेवून वाईट संगतीला बळी न पडता चांगले व्यक्तिमत्व घडवून देशाप्रती आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे.
काही महत्वाचे निबंध:
- माझी आई बेस्ट मराठी निबंध {2023} Mazi Aai Nibandh in Marathi
- माझे बाबा अप्रतिम निबंध | Maze Baba Nibandh in Marathi
- माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Marathi Nibandh
- माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh
- पाऊस पडला नाही तर | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
- मी पक्षी झालो तर बेस्ट निबंध {2023} Mi Pakshi Zalo Tar Nibandh
निष्कर्ष: Bharat Desh Mahan Nibandh Marathi
विद्यार्थ्यांनो तुम्हाला ‘भारत देश महान निबंध‘ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेन्ट करून सांगा. जर तुम्हाला Bharat Desh Mahan Nibandh Marathi आवडला असेल तर तुमच्या वर्ग मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा.
दिलेला निबंध तुम्ही खलील विषयांवर देखील लिहू शकता.
माझा भारत देश माहिती, माझा आधुनिक भारत, माझा भारत म्हणजे स्वराज्य, माझा प्रिय भारत निबंध, माझा देश माझी जबाबदारी निबंध, भारत देश निबंध, भारत देश महान निबंध, माझा देश निबंध मराठी 8वी.
धन्यवाद!