मी पक्षी झालो तर बेस्ट निबंध {2024} Mi Pakshi Zalo Tar Nibandh
Mi Pakshi Zalo Tar Nibandh: उंच आकाशामध्ये निवांतपणे उडणाऱ्या पक्षांना पाहून तुम्हालाही कधी न कधी आपण पक्षी असाव अस नक्कीच वाटल असेल.
पक्षी बनून मनसोक्तपणे हिंडाव आणि मौजमजा करावी असे विचार खूप वेळा मनात येतात. परंतु हे अजून तरी शक्य झालेल नाही.
आज आपण Mi Pakshi Zalo Tar Essay कल्पनात्मक निबंध पाहणार आहोत.
चला तर मग या कल्पनेच्या दुनियेत जाऊन आपण सुरुवात करूया – Mi Pakshi Zalo Tar Nibandh.
10 ओळी – मी पक्षी झालो तर | Mi Pakshi Zalo Tar Essay
तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून पाच सहा ओळी लिहा:
- मी पक्षी झालो तर आकाशात जाऊन मोकळ्या स्वच्छ हवेचा आस्वाद घेईन.
- झाडांच्या उंच टोकावर जाऊन बसेन आणि ताजी फळे मनसोक्त खाईन.
- मी पक्षी झालो तर बिना टिकीटाच जगभर फिरेन.
- पक्षी होऊन मी शाळेत उडून जाईन.
- निसर्गाचे सौन्दर्य, नदी, पर्वते सगळं जवळून पाहीन. |Mi Pakshi Zalo Tar Nibandh
- मी पक्षी झाल्यावर गवतावर मस्त लोळेन व सर्व पक्षांशी मैत्री करेन.
- पक्षी होऊन मी निळ्याभोर आकाशात उंच भरारी घेईन व विहार करेन.
- एखाद्या हिरव्यागार वृक्षाच्या ढोलीत माझ टुमदार घरटं असेल.
- मी पक्षी झालो तर उगवत्या सूर्यनारायणाच्या स्वागताला सज्ज असेन.
- पक्षी होऊन सगळ्यांना मदत करायला मला खूप आवडेल.
मी पक्षी झालो तर निबंध | Mi Pakshi Zalo Tar Nibandh
Mi Pakshi Zalo Tar Nibandh–
“वाटे मजला पक्षी व्हावे
स्वच्छंदी आकाशी उडावे
नको चिंता व्यर्थ कशाची
आनंदे नभासी भिडावे”..
शाळा सुटल्याने मी घाईघाईने घराकडे निघालो होतो. कारण आज आई गावाहून येणार होती. शाळेपासून घर बरेच लांब होते. सूर्य डोक्यावर तळपळत होता. सायकलवर पाय मारता मारता धाप लागली होती. एवढ्यातच एक पक्षी माझ्या डोक्यावरुन भुर्कन उडून गेला. ते पासून माझ्या मनात आल की, ‘मला पंख असते तर’…
खरच, मी पक्षी झालो तर किती बर झाल असतं!
मी या पाखरासारखा भुर्र्कन उडून आईकडे गेलो असतो. माणसांना पंख असते तर त्यांच्या प्रवासातील सर्व समस्या दूर झाल्या असत्या.
माणसे कोठेही, केव्हाही जाऊ शकली असती. मग वाहनांना गर्दी झाली नसती. आगगाडी, एस. टी., विमाने या वाहनांचा क्वचितच वापर झाला असता. माणसे पंखांच्या मदतीने आकाशात उडू शकली असती.
मी पक्षी झालो तर मी जगप्रवासाला निघेण. मला आग्राचा ताजमहाल पाहवायचा आहे. काश्मीरचे उद्यान पाहावयाचे आहे. लंडनच्या चर्चमधील घंटा, अमेरिकेतील मोठमोठी शेती, रशियातील व्होल्गा नदी हे सगळं पाहावयाचे आहे. आणि आणखी कितीतरी गोष्टी करावयाच्या आहेत.
मी पक्षी झालो तर मी नवे मित्र मिळवेन. आकाशात विहार करताना मला माझे नवीन मित्र मिळतील. हिरव्या राघुशी मैत्री करेन. गोड गळ्याच्या कोकिळेशी दोस्ती करून तिचे सुरेल गाणे ऐकेन. गरुडाशी संधान साधून त्याची गरुडभरारी शिकून घेईन. मोरासंगे राहून त्याचे नृत्य शिकून घेईन.
मी पक्षी झालो तर मी त्या पंखांचे सामर्थ्य वाढविन. जास्तीत जास्त उंच उडण्याचा प्रयत्न करेन. आणि मग एक दिवस अशी झेप घेईन की अवकाशाच्या पलीकडे अंतराळात पोहचेन. मग मलाही चंद्राचा, मंगळाचा वेध घेता येईल. |Mi Pakshi Zalo Tar Nibandh
पण हो, जेव्हा मला पंख असते तर हे शक्य होईल. तोवर तरी सायकलवरच पाय मारायला हवेत ना?…
मी पक्षी झालो तर निबंध – २
Mi Pakshi Zalo Tar Marathi Nibandh Set 2
लहापणापासून मला पक्षांचे खूप आकर्षण आहे. लहानपणी अंगणात येणाऱ्या पक्षांचे मी निरीक्षण करत असे. मोठे झाल्यावर पक्षांची माहिती मिळवू लागलो. फोटो घ्यावे लागलो. याद्वारे मला पक्षी जीवनाची माहिती मिळाली. त्यांच्यातील विविधिता कळाली. आता मी एक दुर्बीण घेतली आहे. त्यामुळे मला उंच उडणाऱ्या पक्षांचे निरीक्षण करता येते.
एकदा पक्षांचे निरीक्षण करताना माझ्या मनात आले, खरचं मी पक्षी झालो तर.. अहाह! मला सुंदर पंख, सुंदर रंग, मऊ मऊ अंग मिळेल. माझा रंग आकर्षक असेल. कदाचित डोक्यावर तुरा व लांब शेपटी असेल.
जर मी पक्षी झालो आणि मला पंख असते तर किती मज्जा येईल! मी तर उडत उडत शाळेत जाईन. रस्त्यावरचे खड्डे, वाहतूक कोंडी या सगळ्याचा प्रश्न टळेल. कुठेही जायचं असेल तर रांग लावा, तिकिटे काढा हे सगळं संपेल.
पक्षी झाल्यावर मी जंगलात हिंडेन. पंख फडफडवत कमी उंचीवर उंडणारे पक्षी मला विशेष आवडत नाहीत; पण उंच आकाशात आपले पंख पसरून शांतपणे उडणारे पक्षी मला फार आवडतात,
हे पक्षी ऋतुप्रमाणे आपले देश बदलत असतात. त्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास ते करतात.
मी पक्षी झालो तर असेच विविध देशांना भेटी देईन. प्रवास करायला मला खूप आवडतं.
जगभरातील लोकप्रिय आणि सुंदर स्थळांना मी भेटी देईन. दमलो की झाडावर बसेन. आवडतील तो फळे खाईन. मनाला वाटेल तिथे पानी पिईन. एकूण काय सगळा आनंदी आनंद.. स्वातंत्र..
पक्षी परीक्षेची काळजी नाही, अभ्यासाची कटकट नाही, पुढे कोणत्या प्रकारच शिक्षण नाही. नोकरी की व्यवसाय ही चिंता नाही. घराचा, जागेचा प्रश्न नाही. शहरातील गर्दी नाही.
पण.. पण.. मनात आल, त्या पक्षाच्या जगातसुद्धा काही प्रश्न असतीलच.
कोणत्या झाडावर कोणी राहावे, याबाबत नियम असतीलच. आपल्यासारख्या आंगतुकला ते सामावून घेतील का? |Mi Pakshi Zalo Tar Nibandh
आपण पक्षी होऊन वेगवेगळे देश पहिले, तर त्याच वर्णन आपण कोणाला सांगणार? कारण पक्षांना त्याच कौतुक वाटणार नाही. आपल्या प्रवासाच वर्णन आपण लिहु शकणार नाही.
बापरे.. कसल ही जीवन चित्र काढता येणार नाही. साधा फोटो घेता येणार नाही.
नको रे बाबा पक्षी होण मी आपल माणूस आहे तेच बर आहे.
महत्वाचे निबंध:
- माझी आई बेस्ट मराठी निबंध {2023} Mazi Aai Nibandh in Marathi
- माझे बाबा अप्रतिम निबंध | Maze Baba Nibandh in Marathi
- माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Marathi Nibandh
- माझा देश मराठी निबंध | Maza Desh Marathi Nibandh
- पाऊस पडला नाही तर | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
- मी पक्षी झालो तर बेस्ट निबंध | Mi Pakshi Zalo Tar Nibandh
- स्वच्छतेचे महत्व निबंध |Swachata Che Mahatva Nibandh
निष्कर्ष – Mi Pakshi Zalo Tar Nibandh
आम्ही आशा करतो तुम्हाला “मी पक्षी झालो तर” (Mi Pakshi Zalo Tar Marathi Nibandh) नक्कीच आवडलं असेल.
हा निबंध तुम्ही मला पंख असते तर, Mi Pakshi Boltoy Marathi Nibandh, Mi Pakshi Jhale Tar, Mi Pakshi Boltoy Marathi Atmakatha या विषयावरतीही लिहू शकता. तुमच्या मित्र-मैत्रीणीना शेअर करायला विसरू नका.
Mi Pakshi Zalo Tar Essay लक्षात ठेवण्याकरिता किंवा तुमच्या स्वत:च्या शब्दांमद्धे लिहताना खालील मूद्दे लक्षात ठेवा.
- शाळेत उडून जाईन.
- वाहतूक कोंडीचा प्रश्न नाही.
- निसर्गाचे दर्शन
- प्रवासात टिकिट नाही
- स्वच्छंदी जीवन
- खूप भ्रमंती
- व्हिसा, पासपोर्ट नको
तुमचे विचार आम्हाला कमेन्ट सेक्शन मध्ये कळवा.
इयत्ता नववी आत्मकथन नमुना पक्षी झाले तर
‘पक्षी झाले तर’ यावर निबंध उपलब्ध आहे.