पाऊस पडला नाही तर | Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh: उन्हाळ्यातील कडक उन्हाने व उकाड्याने बेजार झाल्यावर सर्वजण पावसाची वाट पाहत असतात. लहान मुलांपासून ते अगदी वयोवृधांपर्यंत सर्वांनाच या पावसाची आतुरता लागलेली असते.
पावसामुळे दरवळणारा मातीच्या सुगंधाने मन व्यापून जाते. पण… पाऊस पडलाच नाही तर?
चला तर मग आज आपण ‘पाऊस पडला नाही तर‘ (Paus Padla Nahi Tar) या विषयावर निबंध लेखन करूया.
पाऊस पडला नाही तर 10 ओळी | Paus Padla Nahi Tar Nibandh 10 Lines
- पाऊस पडला नाही तर सजीवसृष्टीला धोका निर्माण होईल.
- सगळीकडे रोगराई पसरेल.
- पाऊस पडला नाही तर विहिरी आटून जातील.
- नदी, नाले कोरडे पडतील व झाडे सुकून जातील
- पाऊस पडला नाही तर धान्य पिकवता येणार नाही.
- हिरवेगार रान पाहायला मिळणार नाही.
- जमिनीला भेगा पडतील.
- सगळीकडे वाळवंट निर्माण होईल.
- पाऊस पडला नाही तर आपली तहान भागणार नाही.
- परिणामी पाऊस न पडल्याने जीवन जगणे मुश्किल होऊन जाईल.
Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
पाऊस पडला नाही तर (Paus Padla Nahi Tar)…
‘आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सारी
किती चातक चोचीने
प्यावा वर्षाऋतु तरी|’
बा.सी. मर्ढेकरानी किती अर्थपूर्ण वर्णन केलय पावसाच! श्रावण म्हणजे आनंदघन, चैतण्याचं लेणं! धरतीमाता अगदी आतुर होऊन पावसाची वाट बघत असते. सर्वांना नवजीवन देणारा पाऊस, सर्वांना प्रफुल्लित करणारा पाऊस, मरगळ झटकणारा, आनंदोस्तवात डुंबायला लावणारा असा हा पाऊस!
त्याच्या परिसस्पर्शानं जीवनाचा सोनं होतं. शेतकर्याला अमृतप्राप्तीचा आनंद होतो. चराचराला नवीन चैतन्य मिळतं.
पण जर का हा पाऊस पडला नाही तर..?
असे मनात आणणे देखील संकटाचे आहे. जो आपणास जगवतो, तो पाऊस पडलाच नाही तर..(Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh) आपले अस्तित्व राहील काय?
ज्या पावसामुळे शेती पिकते, अन्नधान्य मुबलक प्रमाणात मिळते, त्या पावसानं पडायचंच नाही अस ठरविल तर संपूर्ण जगात हाहा:कार माजेल. धान्य न मिळाल्याने माणूस जगू शकणार नाही.
पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहतात. जमिनीवर वनराई फुलते. विविध पशू-पक्षांना आपल छोटसं घरकुल मिळत. पाणीच नसेल तर मग या पक्षांनी झाडांवर आपला निवारा शोधण्यासाठी कुठं जायचं?
पाऊस पडला नाही तर सगळ्यात मोठ प्रश्नचिन्ह शेतकर्यांपूढे असेल. पिके घेता येणार नाहीत. तर मग आपल्यालाही धान्य कोठून मिळणार? आपल्या मूलभूत गरजाही भागणार नाहीत.
भारताच्या इतिहासात दुष्काळाने बर्याच वेळा थैमान घातले आहेत. हा दुष्काळ अनेक जणांचे बळी घेण्यास करणीभूत ठरला आहे. एकदा दुष्काळ आला की महागाई आली; महागाई वाढली की भष्टाचार वाढला आणि त्याला जोडून इतर समस्या वाढल्या.
पाऊस न पडल्याने झालेले केवढे नुकसान..?
विशेष म्हणजे पाऊस पडलाच नाही तर शाळेत जाणार्या लहान मुलांना आपले पावसाचे गाणे कसे गाता येईल? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? हे गाणे म्हणून पावसाळ्यातही सुट्टी कशी आणता येईल? ही झाली थोडी मज्जा!
पण खरचं, पाऊस पडला नाही तर..(Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh)
या कल्पनेनेच अंगाला घाम फुटतो. जीवनचक्र ठप्प झाल्यासारखे वाटते. शेतात काम करणारा शेतकरी ढगांकडे टक लावून बसलेला दिसतो; अन मनात धस्स होत. वाटतं पाऊस हवाच! नाहीतर करपलेल्या धरतीसमवेत सर्वांच्याच मनाची कोवळी पालवी करपून जाईल. दुष्काळ पडेल.
म्हणून पाऊस हा हवाच.. नाही का?
पाऊस पडला नाही तर निबंध 2
Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh Set 2
मुद्दे: [ पाण्याचा दुष्काळ – दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम – शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम – नदी, नाले, विहीरींची स्थिति – सजीवसृष्टीवर होणारा परिणाम ]
“पाऊस म्हणजे जणू मातीचा सुगंध
पावसाच्या टपोर्या थेंबांनी
खुले चेहर्यावरचा आनंद
कोसळणार्या धारांमध्ये
हरवून जाई आपले मन
सुंदर आठवणीच्या शिदोरीत
डोकावण्याचा क्षण..”
कधी कधी पावसामुळे सर्वत्र झालेला चिखल पाहून पाऊस नकोसा वाटतो. मुसळधार पावसामुळे शाळेला सुट्टी पडते, बाहेर पडता येत नाही, मित्रांसोबत खेळायला जाता येत नाही, सर्वत्र पाणी साचलेले असते. छत्री आणि रेनकोट सतत घेऊन फिरावे लागते त्यामुळे असे वाटते की पाऊस पडलाच नाही तर सगळेच त्रास कमी होतील परंतु खरच पाऊस संपावर गेला तर काय होईल..?
याची कल्पना करणे अशक्य आहे.
संपूर्ण सजीव सृष्टी पावसावर अवलंबून आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मानवाला पाण्याची गरज असते. पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी, स्वछ्तेसाठी, घरगुती कामांसाठी पाण्याची आवश्यकता असते. हे पाणी आपल्याला पावसामुळेच मिळते. शेतीसाठी पावसाची गरज असते.
पाऊस पडला नाही तर सर्वात जास्त नुकसान शेतकर्यांना भोगावे लागेल. पाऊस पडला नाही तर धान्य, पीक घेता येणार नाही, जमिनीला भेगा पडतील. नदी, तलाव, विहिरी आटून जातील. झाडे नष्ट होतील. पशू-पक्षांना पाणी उपलब्ध होणार नाही. थोडक्यात सजीवसृष्टी धोक्यात येईल.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्व ऋतु महत्वाचे आहे. सजीव सृष्टी संतुलित ठेवण्यासाठी प्रत्येक ऋतूंचे म्हत्वाचे योगदान आहे. कडक उन्हांनंतर आलेला हा ऋतु स्वत:सोबत आनंददायक वातावरण घेऊन येतो. सर्वत्र हिरवळ बघून मन प्रसन्न होते. त्यामुळे पाऊस हवाच! पाऊस संपावर गेला तर पृथ्वीवरील जीवन नष्ट होईल.
महत्वाचे निबंध:
- माझी आई निबंध | Mazi Aai Ninbandh in Marathi
- माझे बाबा निबंध | Majhe Baba Nibandh in Marathi
- माझी शाळा मराठी निबंध | Mazi Shala Marathi Nibandh
- मी पक्षी झालो तर निबंध | Mi Pakshi Zalo Tar Nibandh in Marathi
- सूर्य उगवला नाही तर निबंध |Surya Ugavala Nahi Tar Marathi Nibandh
निष्कर्ष: Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh
आम्ही आशा करतो की तुम्हाला पाऊस पडला नाही तर (Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh) आवडला असेल. हा निबंध तुम्ही खाली दिलेल्या विषयांवरतीही लिहू शकता.
पाऊस पडला नाही तर, पाऊस पडला नाही तर काय होईल निबंध, paus padla nahi tar, paus padla nahi tar nibandh in marathi, paus padla nahi tar kay hoil, paus padla nahi tar mahiti.
पाऊस पडला नाही तर मराठी निबंध (Paus Padla Nahi Tar Marathi Nibandh) तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेन्ट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.